आजकाल दाढी ठेवण्याची फॅशन आहे. अनेकांना दाढी राखावी वाटते परंतु दाढीच्या केसांत वाढ होत नसल्याने ती राखता येत नाही. काही घरगुती उपाय करून दाढीच्या केसांची वाढ होऊ शकते.

खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याच्या तेलाने केसांची चांगली वाढ होते. त्यामुळे आहारात खोबऱ्याच्या तेलाचा वापर करा. तसेच खोबऱ्याच्या तेलाने रोज दाढीच्या केसांची मसाज करा. खोबऱ्याच्या तेलात ५-६ कढिपत्त्याची पाने टाकून ते गरम करा. त्यानंतर या तेलाने दाढीला मसाज करा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा धुवा.

भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बिया या केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. भोपळ्याच्या बिया सुकवून खा. या बियांच्या सेवनाने दाढीच्या केसांची चांगली वाढ होते.

गाजर ज्यूस
आहारामध्ये गाजर जुसच समावेश करा.

दालचिनी
दालचिनी हा घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दालचिनी पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून मिश्रण बनवा. त्यानंतर हे मिश्रण दाढीवर लावा. तसेच तुम्ही दालचीनी गरम पाण्यात टाकून त्यात मिसळून सकाळी पिऊ शकता.

पालक
पालक हे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. पालक केसांना ऑक्सीजन पोहोचवण्याचं काम करते. आहारामध्ये पालक भाजीचा समावेश करावा. तसेच नियमितपणे पालक ज्यूस प्यावे.

आवळा तेल
चेहऱ्याला नियमितपणे १०-१५ मिनिटे आवळ्याच्या तेलाने मसाज करा.