उन्हाळा सुसाह्य करण्यासाठी वाळा ही वनस्पती मदत करते. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळा या वनस्पतीची मुळे खूपच उपयोगी आहे. जाणून घ्या वाळा या वनस्पतीचे इतर फायदे

पाण्यात वाळा टाकून प्यायल्याने पाणी थंड व सुगंधी होते. वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करते.

घराभोवती वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर वातावरण थंडगार बनते.

वाळा पित व कफनाशक असून दमा, खोकला, उचकी विकारांवर उपयुक्त आहे.

वाळा जाळून धुरी घेतल्यास डोकेदुखी कमी होते.

वाळा भिजविलेले पाणी खडी साखरेसह पिल्याने उन्हाळी लागणे, जळजळ होणे अशा समस्यांचा त्रास कमी होतो.

घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे यावर वाळ्याचे चूर्ण लावले तर तात्काळ अराम मिळतो.

वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाचा वापर अत्तरे, सौंदर्यप्रसाधने, साबण उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो.