उन्हाळा सुसाह्य बनविण्यासाठी अनेक जण एसीचा आधार घेतात. मात्र नेहमीच एसीत राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घ्या एसीमुळे कोणते त्रास होऊ शकतात याविषयी माहिती –
अंगदुखी
अनेकांना एसीची थंड हवा सहन होत नाही, यामुळे अंगदुखी, हाडे दुखू शकतात.
डोकेदुखी
अनेकांना एसीची थंड हवा सहन होत नाही. यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
सुस्त, थकवा आणि अशक्तपणा
एसीमध्ये जास्तवेळ राहिल्यास तुम्हाला अधिक सुस्त वाटू शकते. जे लोक जास्त वेळ एसी रूमध्ये बसतात त्यांना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
घसादुखी
एसीमुळे घशाचे आरोग्य बिघडू शकते. वातानुकूलित यंत्रणा खूप कोरडी असल्याने घशात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.
डिहायड्रेशन
अधिक एसीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे त्वचा देखील कोरडी पडते.
त्वचेचे आरोग्य बिघडते
एसीमध्ये जास्त वेळ राहणाऱ्या लोकांच्या त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. त्वचा कोरडी आणि टॅन देखील होऊ शकते.