इटिंग डिसऑर्डरचा रुग्ण एकतर गरजेपेक्षा जास्त अन्न खातो किंवा खूपच कमी खातो. या दोन्हींचेही शरीरावर घातक परिणाम होतात. हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आणि शारीरिक आजार आहे. जाणून घ्या इटिंग डिसऑर्डरची लक्षणे, कारणे, आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती –

इटिंग डिसऑर्डरची लक्षणे
अति जास्त किंवा अति कमी आहार घेणे
अचानक वजन कमी होणे किंवा वजन वाढणे
जेवणानंतर अनेक वेळा बाथरूममध्ये जाणे
मूड स्विंग आणि चिडचिड
थकवा आणि चक्कर येणे
सारखी खाण्याची इच्छा होणे किंवा भूक मरणे

इटिंग डिसऑर्डरची कारणे
अनुवांशिक
वयात होणाऱ्या बदलांमुळे
हार्मोन्समुळे
मीडिया किंवा जाहिरातींच्या प्रभावाखाली येऊन खाण्यापिण्याच्या सवयी ठरवणे
ताणतणाव, नैराश्य
शरीराबद्दल नकारात्मक विचार

इटिंग डिसऑर्डरवर उपचार
इटिंग डिसऑर्रडरची समस्या असेल तर डॉक्टरांकडे जा. लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकता.
आहाराबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित करा.
प्राणायम, योगासने करा
कुटुंब, समाज, इतर-मैत्रिणी यांसोबत वेळ घालवा यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहील.