नखांचा रंगामध्ये होणारे बदल हे शरीराच्या आजारांचे संकेत देतात. निरोगी नखे नेहमी नैसर्गिकरित्या गुलाबी रंगाची असतात. जाणून घ्या नखांच्या रंगावरून शरीरात असणाऱ्या आजारांच्या समस्या –

पांढरे डाग, रेषा
जर नखांवर पांढरे डाग किंवा रेषा असतील तर ते कदाचित झिंक किंवा कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडे आणि दात कमकुवत होणे, हाता-पायांना मुंग्या येणे, स्नायू दुखणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. कॅल्शिअम वाढविण्यासाठी झिंक किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्यास ही समस्या कमी होते.

पिवळ्या किंवा हलके निळ्या रंगाची नखे
जर पिवळ्या किंवा हलके निळ्या रंगाची नखे असतील तर शरीरात लोह कमी असू शकते. परिणामी अशक्तपणा जाणवतो.