पूर्वी जेवण बनविण्यासाठी पितळेची कल्हई केलेली किंवा मातीची भांडी वापरण्यात यायची. मातीची,पितळेची कल्हई केलेली भांडी वापरल्याने शरिराला आवश्यक ती खनिजे जेवणातून मिळतात. मात्र आजकाल मातीची, पितळेची कल्हई केलेली भांडी वापरण्याची पद्धत लुप्त झाली आहे आणि सरसकट बरेच लोक अॅल्युमिनियम, हिंडालियमच्या भांड्यामधून जेवण बनवत आहेत. अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण बनविल्याने शरीरावर दुष्परिणाम होतात.
अॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम
अॅल्युमिनीयमच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. हा धातू अधिक प्रमाणात शरीरात गेल्यास मांसपेशी, मूत्रपिंडे, यकृत, हाडे इत्यादी ठिकाणी हळूहळू साठू लागतात आणि त्या अवयवांवर दुष्परिणाम करतात.
उदा. हाडांशी संबंधित आजार, वारंवार तोंड येणे, अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, नैराश्य, उदास वाटणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच मेंदूंच्या पेशींवर हानीकारक परिणाम होतो.
अॅल्युमिनियम ऐवजी कोणती भांडी वापरावीत
शक्य असेल तर मातीची, पितळेची कल्हई केलेली भांडी वापरावीत आणि तेही शक्य नसेल तर स्टेनलेस स्टीलची भांडी वापरा .