गेल्या काही वर्षांत जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडर उत्पादनावर कॅन्सरचे अनेक आरोप झाले. त्यामुळे टॅल्कम पावडर हा विषय चर्चेत आला. जाणून घ्या टॅल्कम पावडर म्हणजे काय आणि टॅल्कम पावडरमध्ये कोणते घटक आढळतात आणि टॅल्कम पावडरच्या वापरावर का प्रश्नचिन्ह निर्माण झाले याविषयी माहिती –

टॅल्कम पावडर म्हणजे काय?

अगदी नवजात शिशुपासून मोठ्या व्यक्तीं सर्वांसाठी टाल्कम पावडर वापरली जाते.
टॅल्क हे नैसर्गिकरित्या आढळणारं एक खनिज आहे. त्यापासून टॅल्कम पावडर बनवली जाते. हे मॅग्नेशियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनपासून बनलेलं आहे. टॅल्कचं रासायनिक नाव Mg3Si4O10(OH)2 असं आहे. कॉस्मेटिक तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यात ओलावा शोषून घेण्याची क्षमता आहे.

टॅल्कम पावडरच्या वापरावर का प्रश्नचिन्ह निर्माण झाले याविषयी माहिती –
ब्युटी केअर उत्पादनांमध्ये टॅल्कच्या वापर करण्यात येतो. टॅल्कच्या वापराने कॅन्सर होतो असा निष्कर्ष काढण्यात आला. टॅल्क काढताना एस्बेस्टोस देखील सोडला जातो. एस्बेस्टोस, ज्याला अभ्रक म्हणूनही ओळखले जाते, हा सिलिकेट खनिजाचा एक प्रकार आहे. त्याची स्फटिक रचना वेगळी आहे. यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होतं.शरीराच्या बाह्य भागावर ऍसबेस्टोस लागले तर त्याचा काही त्रास होत नाही. परंतु ते शरीराच्या आत गेले तर मात्र हानिकारक असते. त्यामुळे कॅन्सरसारखे हानिकारक आजार देखील होऊ शकतात.

२०२० मध्ये जॉन्सन बेबी पावडर कंपनीने अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री थांबवली होती. या पावडरमध्ये एस्बेस्टोसचा एक प्रकारचा हानिकारक फायबर आढळून आला होता.