माझं आरोग्य टीम ः अपुऱ्या झोपेमुळे (sleep) माणसाच्या जीवनशैलीवर (life style) अत्यंत विपरीत परिणाम होत आहेत. रात्रीच्या वेळी मोबाईलचा (mobile) अतिवापर, झोपेकडे दुर्लक्ष, अर्धवट झोप, आहार (diet) यामुळे आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवत असून, नैराश्य, ताणतणावालाही आमंत्रण मिळते. आता याच अपुऱ्या झोपेमुळे आपला मेंदू (brain) म्हातारा होतो असे समोर आले आहे. एका संशोधनात ही बाब उघड झाली. (Inadequate sleep causes old age in youth)

रात्रीची झोप मनुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे मनुष्य दिवसभर उत्साही आणि तणावापासून दूर राहू शकतो. मात्र, आपली दिनचर्या अत्यंत धावपळीची, धकाधकीची झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होऊ लागला आहे. याच झोपेबाबत एका संस्थेने संशोधन केले असून, त्यात अपुऱ्या, अवेळी झोपेमुळे माणसाचा मेंदू म्हातारा होत असल्याने समोर आले. संशोधनानुसार मनुष्य एक रात्र न झोपल्याने त्याचा मेंदू जवळपास दोन वर्षांनी म्हातारा होतो. हे खरे असून, मनुष्याच्या स्मरणशक्तीवरही (Effect on Memory) त्याचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय

अपुऱ्या झोपेमुळे होणारे नुकसान
– आजारपण मागे लागणे
– उच्च रक्तदाबाचा धोका
– रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढणे
– स्मरणशक्ती कमी होणे
– हृदयावर वाईट परिणाम होणे
– नैराश्य, ताणतणाव येणे

उपाय काय करता येतील?
– उत्तम झोप व्हावी यासाठी योग्य वेळ निवडा
– दररोज योग्यवेळी झोपा, वेळेत बदल करू नका
– मोबाईलचा वापर टाळा
– निरोगी आरोग्यासाठी किमान रोज 7 ते 8 तास झोप काढा

लठ्ठपणा कमी करण्यास दही आहे प्रभावी उपाय; कसे ते जाणून घ्या

उत्तम झोप का आवश्यक?
– मानसिक आणि शारिरिक आरोग्यासाठी
– उत्साह, कार्यक्षमता वाढवण्यासाठी
– स्मरणशक्ती, एकाग्रता उत्तम ठेवण्यासाठी
– रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी
– पचनसंस्था, त्वचा उत्तम ठेवण्यासाठी

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)