शरीरामध्ये व्हिटामिन बी ची कमतरत, शरीरातील उष्णता वाढल्यामुळे, मसालेदार पदार्थ खाणे यांसारख्या कारणांमुळे तोंड येण्याच्या प्रमाणात वाढ होते. जाणून घ्या तोंड येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय –
पेरूची पाने
पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या व कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या कराव्यात.
कोमट पाणी
एक ग्लास कोमट पाणी घ्यावे व त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालावे. या पाण्याने दिवसातून तीन ते चार वेळेस गुळण्या कराव्यात.
खोबरे
खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्याने देखील तोंडातील फोड किंवा जखमा कमी होण्यास मदत होते.
कोथिंबिरीचा रस
एक चमचा कोथिंबिरीचा रस तोंडात घ्यावा आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवावा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा.
दही
दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे पोटाची उष्णता कमी होते तसेच शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
तुळशीची पाने
तुळशीची पाने चावून खा. तुळशीच्या पानात अँटीबायोटीक्स असतं. याचा रस तोंडातील लाळेत मिसळतो. यामुळे तोंडातील फोड, जखमा बऱ्या होतात.
तुरटी
तुरटीच्या पाण्याने चूळ भरा. तुरटीमध्ये अँटीबायोटीक्स असतं. तुरटीच्या पाण्याने चूळ भरल्याने तोंडाची आग होऊ शकते. मात्र या उपायाने वेदना कमी होतात आणि संसर्ग होत नाही.
मध
मधामध्ये अँटीबायोटीक्स असतं. तोंडातील फोडांवर किंवा जखमेवर मध लावल्याने तोंडात खूप लाळ येते. त्यामुळे तोंडातील जखमा लवकर बऱ्या होतात.