उडदाची डाळ बऱ्याच जणांना खायला आवडत नाही. मात्र ही डाळ शरीराच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जाणून घ्या उडदाची डाळ खाण्याचे फायदे –

शरीराच्या वेदना आणि सूज कमी
उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे शरीराच्या वेदना आणि सूज कमी होण्यासाठी मदत होते.

सर्दीवर गुणकारी
उडदाची आमटी पिल्याने सर्दी हमखास कमी होते.

एनर्जी वाढते
उडीद डाळीमध्ये भरपूर लोह असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते.

हृदय निरोगी राहते
उडदाच्या डाळीमध्ये पोटॅशियम असते. यामुळे रक्तवाहिन्या आणि धमण्यांमधील ताण कमी होतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.

पोटाचे विकार कमी होतात
उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.पचनाशी संबंधित समस्या उडीद डाळ खाल्ल्याने कमी होतात. उडदाच्या डाळीमध्ये फायबर असल्यामुळे ते पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करतात. उडदाच्या डाळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी
मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडदाची डाळीचा आहारात वापर करणे खूप फायदेशीर ठरते. उडदाची डाळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
उडळाची डाळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते.