गोड पदार्थ अनेकांना आवडतात. साखर, गूळ अनेकजण खातात. तसेच पदार्थांत गोडी निर्माण करण्यासाठी साखर, गूळ वापरतात. परंतु साखरेपेक्षा गूळ खाणे कधीही चांगले कारण तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोमट पाण्यात किंवा चहामध्ये साखरे ऐवजी गूळ घालून प्यावे, हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊ गूळ खाण्याचे फायदे
शरीराचे पोषण होते
गुळात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम या सारखे घटक आढळतात. गुळामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. त्यामुळे शरीराचे पोषण होते.
रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते
गूळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. शरीरात जर अशक्तपणा जाणवत असेल तर नियमित गूळ खा. तसेच ॲनिमियामुळे लाल रक्त पेशी कमी झाल्या असतील तर गूळ खा. याचा चांगला फायदा होतो. गुळामध्ये लोह आणि फॉलेट असल्याने शरीराचे योग्य पोषण होते. नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते.
पचनक्रिया सुरळीत राहते
जेवणानंतर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते, तसेच अपचनाचा त्रास कमी होतो.
महिलांच्या समस्यांवर गुणकारी
महिलांना मासिक पाळीत खूप वेदना होतात. मासिक पाळीत येणारे क्रॅंम्प कमी करायचे असेल तर महिलांनी नियमित गूळ खावा.
श्वसनासंबंधी समस्या कमी होतात
ज्या लोकांना श्वसनासंबंधी काही त्रास असेल त्यांनी आवर्जुन गूळ खायला हवं. तिळ-गुळाचे लाडू खाणंही फायदेशीर ठरेल.
हाडे मजबूत होतात
ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्या व्यक्तींनी दूध आणि गूळ एकत्र करून घ्यावे. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. दूध, गूळ यामध्ये आले टाकले तर अतिशय चांगले. कारण हे पदार्थ हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहेत.
ऊर्जा मिळते
ऊर्जा मिळवायची असेल तर गूळ खा. तुम्हाला माहिती आहे का पूर्वी घरी आलेल्या पाहुण्याला गूळ आणि पाणी दिलं जायचं. कारण गूळ आणि पाणी घेतल्याने थकलेल्या माणसाला फ्रेश वाटत असे.
सर्दी-खोकल्यामध्ये फरक पडतो
काळी मिरी आणि आल्याबरोबर गूळ खाल्ल्यास सर्दीमध्ये फरक पडतो. वारंवार खोकला येत असल्यास साखरेऐवजी गुळाचा खडा तोंडात ठेवावा. घसा खवखवणे आणि जळजळ होत असेल तर आल्याबरोबर गूळ खावा.
वजन कमी करायचं असेल तर नियमित गूळ खा
गूळ खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते. गूळ हा पोटॅशिअमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे इलेक्ट्रोलाईट्सला नियंत्रित ठेवण्यास मदत करते तसेच, मेटाबॉलिजम वाढवण्यातही मदत करते.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक असतो. त्यामुळे गुळाचे सेवनही योग्य मात्रेतच करावे.
काळवंडलेली मान उजळण्यासाठी 5 घरगुती उपाय