अनेकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. पूर्वी आपल्याकडे सामूहिक भोजन असले की जेवणानंतर विड्याचे पान खाण्यासाठी देण्याची पद्धत होती. आजही खेडेगावात ही पद्धत पाळली जात आहे. विड्याचे पान खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या विड्याचे पान खाण्याचे आश्चर्यकारक फायदे
भूक वाढण्यास मदत करते
ज्या लोकांना वेळेवर भूक लागत नाही वा भूक कमी झाली आहे अशा लोकांनी विड्याचं पान खावं. त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. रोज सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्याआधी काळी मिरी आणि विड्याचं पान एकत्र करून खा. त्यामुळे भूक वाढते.
डोकेदुखी बरी होते
सतत डोक दुखत असेल तर विड्याचं पान खूप फायदेशीर आहे. त्यासाठी विड्याचं पान घ्या. त्याचा रस काढा आणि तो कपाळाला लावा. नक्की आराम मिळेल.
जखम होते बरी
खेळताना वा काम करताना जर जखम झाली तर विड्याचं पान घ्या. या पानाचा रस त्या जखमेवर लावा. त्यामुळे जखम लवकर बरी होते.
साखर नियंत्रित राहते
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांसाठी विड्याचं पान हे वरदान आहे. विड्याचं पान खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे विड्याचं पान खावं.
तोंडाची दुर्गंधी दूर होते
विड्याचे पान खाल्ल्याने तोंडाची, श्वासाची दुर्गंधी दूर होते.
सर्दी खोकल्यावर गुणकारी
सर्दी खोकला झाला तर विड्याचं पान घ्या. त्याला मध लावा. त्यानंतर ते पान खा. त्यामुळे सर्दी खोकला बरा होतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तुमच्या चेहऱ्यावर डाग असतील तर विड्याच्या पानापासून फेसपॅक बनवा. आधी विड्याची पानं वाटून घ्या.त्यात एक ग्लास पाण्यात मिसळा. त्यानंतर ते पाणी आटवून फेसपॅक तयार करा. तो चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर १५-२० मिनिटांनी धुवून टाका.
पचनशक्ती सुधारते
विड्याचे पान नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. ऍसिडिटी, पोटदुखी यांसाख्या पोटाच्या समस्यांवर विड्याचे पान गुणकारी आहे.
आवाज सुधारतो
आवाजाचा पोत सुधारण्यासाठी विड्याचे पान गुणकारी आहे.
हिरड्या मजबूत होतात
विड्याचे पान बारीक चावून खाल्ल्याने हिरड्या मजबूत होतात.