हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्वचा खूप ड्राय पडते. अशा वेळेस त्वचा मॉइस्चराइज रहावी म्हणून अनेक जण हातापायाच्या त्वचेबरोबरच चेहऱ्यालाही बॉडीलोशन लावतात. यामुळे चेहऱ्याचा ड्रायनेस नक्की कमी होते पण त्वचेच्या इतर समस्या वाढू शकतात.
चेहऱ्याची त्वचा शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक देखील असते तसेच बॉडीलोशनमधील घटक मॉइस्चराइजर किंवा फेसक्रीम पेक्षा वेगळे असतात. बॉडीलोशन दाटसर असल्याने चेहऱ्यावरच्या त्वचेत पटकन मुरत नाही. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर बॉडीलोशनचा जाड राहतो आणि त्वचेचे ओपन पोअर्स बंद होतात.
बॉडीलोशनमुळे चेहऱ्याचे होणारे नुकसान
- काहींच्या त्वचेला बॉडीलोशनमुले अॅलर्जी होते. चेहऱ्याला बॉडीलोशन लावल्याने चेहऱ्याची छिद्र पूर्ण ब्लॉक होऊन जातात. परिणामी त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही तसेच त्वचेतून विषारी घटक किंवा घामही बाहेर टाकला जात नाही. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, फोड येतात. त्यांचे डाग व व्रण चेहऱ्यावर पडतात.
- त्वचेचे ओपन पोअर्स बंद होतात. ओपन पोअर्स बंद झाल्याने तसेच चिकटपणामुळे चेहऱ्यावर धूळ, घाम आणि घाण जमा होतो.
- काहींना चेहरा लाल होणे, त्वचेवर जळजळ होणे, रॅशेस येणे या देखील समस्या निर्माण होतात.
नॅचरल तेलापासून असे बनवा ‘वॅसलीन’! तजेलदार होईल तुमची त्वचा