अनेकांना गोड अधिक प्रमाणात खाण्याची सवय असते. योग्य प्रमाणात साखर, गोड पदार्थ खाणे शरीरासाठी लाभदायक आहे मात्र अतिरेक झाला की शरीरावर दुष्परिणाम होतात शिवाय साखर खाण्याचे व्यसनही (sugar addiction) लागते.
साखर खाण्याचे व्यसन कसे सोडवावे
1) एकाएकी गोड खाणे सोडून दिल्याने अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर खाण्याचे व्यसन एकाएकी न सोडवता हळूहळू कमी करावे.
2) आहारामध्ये फळे, दही, दूध, ताक यांचा समावेश करा.
3) प्रोटीनयुक्त पदार्थ साखर खाण्याची इच्छा कमी करतात. त्यामुळे आहारात डाळी, सोयाबीन, शेंगदाणे यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
4) कडधान्ये, केळी, पालक, ओट्स यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा. फायबरयुक्त पदार्थ रक्तातील साखर वाढवत नाहीत तसेच शरीराला एनर्जी देतात.