दह्याला सुपरफूड म्हणले जाते. दुधापेक्षाही अधिक पौष्टिक घटक दह्यात असतात. दही जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घ्या दही खाण्याचे फायदे – Benefits of eating curd
मधुमेहावर नियंत्रण
दह्यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढते
दह्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते
दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता असते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. त्यामुळे विविध हृदयविकाराची शक्यता कमी होते. रक्तदाब आणि वजनही नियंत्रित राहतो.
दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी
दह्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, जे दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज आहे.
हृदयविकाराचा धोका कमी होतो
दही व्हिटॅमिन बी आणि विशेषतः व्हिटॅमिन बी-12 आणि बी-2 म्हणजेच रिबोफ्लेविनमध्ये समृद्ध आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
दह्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागण्यापासून प्रतिबंधित करते. याशिवाय दह्याचे सेवन केल्याने चयापचय प्रणाली सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पचनशक्ती वाढते
दहीमध्ये लॅक्टोज असते. यामुळे पचनशक्ती वाढते.
केस गळतीवर प्रभावशाली
नियमित दही खाल्ल्याने केस गळती थांबते.
चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर नियमितपणे दही खावे.
शरीराला हायड्रेट ठेवते
रोज दह्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. दह्यामध्ये 66% पाणी असते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. दह्यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आणि पौष्टिक घटक असतात. यामुळे शरीर सदृढ बनते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते.
शरीरातील उष्णता कमी होते
नियमित दही खाल्ले तर शरीरातील उष्णता कमी होते.
( टीप : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दही प्रमाणात खाल्ल्यास त्याचे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत. मात्र, रात्री दही खाल्ल्यास कफ होण्याची शक्यता असते. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .)