योगाच्या नियमित सरावामुळे मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. योगा केल्याने शरीर तर लवचिक बनतेच शिवाय मनही स्थिर राहते. ताडासन, बध्द कोनासन, बलासन, मार्जारासन, सेतू बंधनासन, शवासन या योगासनांच्या मदतीने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.

ताडासन
प्रथम सरळ उभे रहा. नंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्यावर नेत केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे.

बध्द कोनासन
मंडी खालून खाली बसावे. नंतर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांसमोर आणावेत. पायांचे तळवे पोटाजवळ शक्य तितक्या जवळ आणल्यानंतर मांडी, गुडघा आणि पोटरी अशा पायांच्या भागांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर-खाली करावी.

बलासन
प्रथम गुडघ्यावर बसा.
दोन्ही पायांचे पंजे जवळ ठेवा.
दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.
दोन्ही मांड्यांच्या मध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.
आहे त्या स्थितीत स्थिर राहा.
नंतर मानेच्या मागे डोके किंचित उचलण्याचा प्रयत्न करा.
हात समोर आणा आणि आपल्या समोर ठेवा.
दोन्ही हात गुडघ्यांच्या रेषेत राहतील.
दोन्ही खांदे जमीनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न करा.
थोडा वेळ या स्थितीत रहा.
हळूहळू हात पुढे ताणत श्वास घ्या.
सामान्य स्थितीत परत या.

मार्जारासन
सर्वप्रथम गुडघ्यांवर बसा नंतर हात खाली टेकवा. शरीराचा आकार मांजरीप्रमाणे दिसेल.
नंतर दीर्घ श्वास घ्या आणि डोक्याचा भाग मागच्या बाजूला आणा. पाठीचा कणाच्या शेवटचा भाग वर आणण्याचा प्रयत्न करा.
श्वास सोडताना डोके खाले नेऊन तोंडाखालच्या हनुवटीने छातीला स्पर्श करायचा प्रयत्न करा. पुन्हा दिर्घ श्वास घ्या. हे आसन किमान १० वेळा करा.

सेतू बंधनासन
पाठीवर उताणे झोपा. हलके हलके श्वास घ्या.
नंतर हात बाजूला ठेवा.
पाय गुडघ्यात दुमडून नितंबांजवळ आणावेत.
कंबर शक्य तितकी वर उचलून घ्या. हात जमिनीवरच ठेवा.
श्वास रोखून धरावा.
नंतर श्वास सोडत पुन्हा कंबर जमिनीवर टेकवावी. पाय सरळ करून विश्रांती घ्यवी.

शवासन
शवासन योगसाधनेच्या बैठकीच्या आरंभी व अखेरीस केले जाते.
सपाट भागावर पाठीवर झोपा. पाय एकमेकांपासून दूर ठेवा.
डोळे बंद करा आणि हळूहळू श्वास घ्या. श्वासावर लक्ष द्या.
मन शांत ठेवा.

‘या’ घरगुती फेसपॅकने घालवा चेहऱ्यावरील टॅनिंग

तुतीच्या पानांचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे