वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांची आवश्यकता असते. व्यायाम प्रकारामध्ये खालील योगासनांचा समावेश करून वजन कमी करता येऊ शकते.

१) सूर्यनमस्कार

वजन कमी करण्यासाठी दिवसातून किमान १० ते १५ वेळा सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे शरीराची लवचिकता वाढते. तसेच हाड मजबूत होतात, एकाग्रता वाढते.

२) सर्वंगासन

सर्वंगासनमध्ये संपूर्ण शरीराचा तोल खांद्याच्यावर सांभाळला जातो. या आसनामुळे वजन कमी होते शिवाय हात आणि खांदे बळकट होतात, पाठीचा कणा लवचिक बनतो. मेंदूला अधिक रक्तपुरवठा मिळतो.

३) धनुरासन

धनुरासनमुळे वजन कमी होण्यास तर मदत होतेच पंरतु त्यासोबतच हार्मोनल संतुलन सुधारते, श्वासोच्छ्वास सुधारते आणि रक्ताभिसरण देखील सुधारते.
धनुरासन करताना प्रथम पोटावर झोपा आणि गुडघे वाकवून आपल्या पायाच्या टोकाला हळू पुढे करत वरच्या बाजूने पकडा. यानंतर हळुवारपणे स्वत:ला वरच्या बाजूस खेचा.

४) वक्रासन

वक्रासन केल्याने शरीरातील चरबी वितळू लागते. शिवाय मानेला आणि पाठीच्या कण्यालाही आराम मिळतो.
वक्रासन करताना प्रथम दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसावे. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवावा.
तसेच डावा पाय सरळ ठेवा, उजवा हात पाठीमागे ठेवा.
हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा. त्यानंतर तुमचा खांदा, मान मागे वळवून मागे पहा. किमान १० ते १५ सेकंद या स्थितीत राहा आणि नंतर याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने हे आसन करा.

 

५) नौकासन

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नौकासन सर्वोत्तम आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे पाठीच्या व पोटाचे स्नायू मजबूत बनतात. तसेच हर्निया सारखे आजार होत नाहीत. नौकासन करताना प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही हात शरीराला समांतर लागून सरळ ठेवावे. आता श्वास बाहेर सोडून हळूहळू दोन्ही पाय वर उचलावेत.
पाय वर उचलत असतानाच आपले डोके, शरीराचा वरचा भाग, हात हळूहळू वर उचलावे.
आपल्या शरीराचा आकार अर्धगोलावस्थेत तोलून धरावा.
१० ते १५ सेकंद याच स्थितीत थांबावे.

६) त्रिकोणासन

त्रिकोनासनामुळे पचनक्रिया सुधारते, चांगली भूक लागते. तसेच या आसनाचा नियमित सराव केल्याने आपल्या पोटावरील, कंबरेवरील आणि पार्श्वभागावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
त्रिकोणासन करताना प्रथम उभे राहा. नंतर दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून पाय सरवून उभे रहा.
यामुळे दोन्ही पायांच्यामध्ये त्रिकोण तयार होईल. त्यानंतर उजवा पाय बाहेरच्या दिशेने हलका बाहेर काढा. आपला उजवा हात आपल्या उजव्या पायावर ठेवा. आपला डावा हात डोकं खाली वाकून उंच करा आणि उजवीकडे वळा. खूप खाली जाऊ नका.

योगा करताना ‘या’ गोष्टींची अवश्य काळजी घ्या

हाताच्या त्वचेचा रुक्षपणा आणि कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय