उंची वाढण्यासाठी योग्य व्यायाम आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. खालील आसनांच्या मदतीने उंची वाढण्यास मदत होईल

पश्चिमोत्तनासन
पश्चिमोत्तनासन करताना योगा मॅट असेल वा चटई तर त्यावर खाली बसा. पाय सरळ करा आणि हाताचे दोन्ही तळवे गुडघ्यावर ठेवा. नंतर डोके आणि छाती पुढे घेत हाताने पायाच्या बोटांना स्पर्श करा. मग श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर आता गुडघ्यांना डोकं आणि कपाळ टेकवा. हाताचा कोपरा जमिनीवर ठेवा. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा.

ताडासन
ताडासन करताना सरळ उभे राहा. पायांत अंतर ठेवा. दोन्ही हात शरीरापासून दूर ठेवा. त्यानंतर आता टाचांवर उभे राहा. मग खांदे, हात आणि छाती वरच्या बाजूस ताणून घ्या. आपल्या संपूर्ण शरीराचा दाब हा टाचांवर राहिल ही काळजी घ्या. काही वेळ असेच उभे राहा.

वृक्षासन
वृक्षासन करताना सुरूवातीला सरळ उभे राहा. दोन्ह हात जोडा. मग उजवा गुडघा वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. लक्षात ठेवा डावा पाय घट्ट ठेवायचा आहे. मग श्वास घ्या आणि सोडा. आता दोन्ही हात वर घेऊन ‘नमस्कार’ करा. त्यानंतर उजवा पाय जमिनीवर ठेवा. आता हीच प्रक्रिया डाव्या पायाने पुन्हा करा.

भुजंगासन
चटईवर किंवा योगा मॅटवर पालथं झोपा. दोन्ही पाय सरळ आणि ताठ ठेवा तसेच दोन्ही पायांचा एकमेकांना स्पर्श केलेला असावा. आता दोन्ही हात छातीच्या जवळ ठेवा. कपाळ जमिनीला लावा. त्यानंतर हळुवारपणे शरीराचा वरील भाग वर उचलावा.
शरीराचा वरील भाग वर उचलताना श्वास घ्यावा. नंतर मागे बघावं. आता स्थितीत नियमित श्वासोच्छ्वास ठेवावा. दोन्ही हात कोपरातून थोडे वाकवावेत. भुजंगासनामध्ये जेवढे शक्य आहे तेवढेच शरीर वर उचलावे. शरीराचा वरील भाग खाली घेताना श्वास सोडावा.