भुजंगासन
या आसनाने शरीर मोकळे होते. तसेच तणाव कमी होतो.
सुरूवातीला पोटावर झोपा. हाताचे दोन्ही तळवे मांड्याजवळ न्या. आता हात खांद्याच्या बरोबरीने आणा व तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. नंतर शरीराचे वजन तळहातावर येऊद्या. मग डोके मागे घेण्याचा प्रयत्न करा. यावेळी छाती पुढे राहिल हे लक्षात ठेवा. अशा स्थितीत 15-20 सेकंद राहा.

सुखासन
मॅट वा चटईवर मांडी घालून सरळ बसा. आता हाताचे तळवे मांडीवर वा गुडघ्यावर ठेवा. नंतर श्वास घ्या सोडा. तुम्ही असं कितीही वेळ बसू शकता. यावेळी एकच गोष्ट करा की पायांची स्थिती बदलत राहा.

 

सेतु बंधासन
सर्वात आधी पाठीवर झोपा. दोन हातांची घडी घाला. आता हळूहळू तुमचे पाय गुडघ्यातून वाकवून जवळ आणा. नंतर जमिनीपासून तुमची कंबर जेवढी शक्य होईल तेवढी वर उचला. श्वास घ्या. थोड्या वेळाने सोडा.

शवासन
मॅटवर सुरूवातीला झोपा. डोळे बंद करा आणि पाय सरळ सोडा. हात शरीरापासून थोडे दूर ठेवा. आता हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या. हे सर्व करताना श्वास घ्या, सोडा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शवासन करताना कधीही झोपू नका. तुमचे लक्ष फक्त स्वतःवर आणि तुमच्या शरीरावर असेल.

टीप– सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सगळी आसने एकदम करू नका.