जागरण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांसारख्या गोष्टींमुळे अनेकांना पित्त्ताचा त्रास जाणवतो. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून अनेक जण अॅसिडिटीची गोळी खातात. गोळीमुळे तात्काळ फरक जाणवतो मात्र याचे देखील शरीरावर वाईट परिणाम होतात तसेच गोळ्या खाण्याची सवय देखील लागते. पित्ताच्या समस्येपासून मुक्ती हवी असेल तर चुकीच्या सवयी आणि दिनचर्येत बदल केला पाहिजे. त्याचबरोबर योगासने देखील केली पाहिजेत. पश्चिमोत्तानासन, वज्रासन या योगासनांच्या नियमित पित्ताच्या समस्येचा त्रास कमी होतो. जाणून घ्या ही आसने योग्य प्रकारे कशी करावीत –
पश्चिमोत्तानासन
पोटाच्या आतील अवयवांना चांगलं ठेवण्यासाठी हे आसन फार महत्त्वाचं आहे. यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
हे आसन करताना योगा मॅट असेल वा चटई तर त्यावर खाली बसा. पाय सरळ करा आणि हाताचे दोन्ही तळवे गुडघ्यावर ठेवा. नंतर डोके आणि छाती पुढे घेत हाताने पायाच्या बोटांना स्पर्श करा. मग श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर आता गुडघ्यांना डोकं आणि कपाळ टेकवा. हाताचा कोपरा जमिनीवर ठेवा. पुन्हा श्वास घ्या आणि सोडा.
वज्रासन
पित्ताची समस्या होत असेल तर जेवण केल्यानंतर हे आसन करावं.
पाय दुमडून गुडघ्यावर बसा. नंतर तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा. डोके सरळ राहिल हे लक्षात ठेवा. नंतर श्वासावर लक्ष द्या. श्वास घ्या आणि सोडा. डोळे बंद करून फक्त आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा. हे आसन तुम्ही सुरूवातीला १० मिनिटं करा. नंतर वेळ वाढवू शकता.
घरातीलच पदार्थ ठेवतील तुमचं ‘हृदय’ निरोगी; दिवसातून एकदातरी सेवन कराच!