योगा शरीर आणि मन तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. सकाळी उठून रोज योगा आणि प्राणायाम केल्याने दिवसभर एनर्जी मिळते आणि तुमचा उत्साह टिकून राहतो. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा करत असताना ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा –

योगा करण्याची योग्य वेळ  –
योगा कधीही आणि केव्हाही करता येतो. मात्र योगा शक्यतो सकाळीच करावा. कारण सकाळी वातावरण शुद्ध असते. तसेच शरीर उत्साही आणि मन प्रसन्न असते. आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी दररोज पाऊण तासाचा योगा आवश्यक असतो. योगा करताना सातत्य टिकवणे देखील महत्वाचे आहे.

योगा नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागीच करावा.

योगा करत असताना सुती आणि सैलसर कपडे घाला.

योगा हा नेहमी रिकाम्या पोटी करावा. जेवण केल्यानंतर तीन-साडेतीन तासानंतर योगा करावा. पाणी किंवा कोणतेही थंड, गरम पेय घेतल्यानंतर अर्धा तासाने योगा करायला हरकत नाही. योगा केल्यानंतर शक्यतो तासभर जेवण करणे टाळावे.

https://mazarogya.com/2021/02/02/benefits-of-pass-raw-turmeric/

योगा करत असताना शक्यतो पाणी पिणे टाळावे. तसेच चहा, कॉफीदेखील घेऊ नये.

योगा केल्यावर अर्ध्या तासाने आंघोळ करावी. योगा केल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण झालेली असते. योगा केल्यावर लगेच अंघोळ केल्यास त्याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

दुर्धर आजार, मानसिक आजार किंवा गर्भवती स्रियांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगा करावा.

https://mazarogya.com/2021/01/25/health-benefit-of-rock-salt/