कॅन्सरचं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर दिसते ती मृत्यूची भीती. कॅन्सरमुळे जगभरातील लाखो लोक आपले प्राण गमावतात. अनेक प्रकारचे कॅन्सर असतात, त्यांची लक्षण ओळखणे आणि त्यावर त्वरित उपचार सुरू करणे आवश्यक असते. अन्यथा ते जीवावर बेतू शकते. आपली जीवनशैली आणि आहाराची पद्धत यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढत आहे. आज आपण अशा काही पदार्थांबद्दल जे कॅन्सर होण्याचा धोका वाढवू शकतात.
नॉनव्हेज आणि प्रोसिड मीट :
एक अहवालानुसार, जे लोक नॉनव्हेज आणि प्रोसिड मीट अति प्रमाणात खातात कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. विशेषतः जे लोक रेड मीट म्हणजेच बकरी, बीफ, पोर्क खातात. तसेच जे लोक अधिक प्रमाणात प्रोसिड फूड खातात त्यांनाही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. मीटचे सेवन आठवड्यात एकापेक्षा अधिक दिवस करणे टाळावे.
अल्कोहोलचे अधिक सेवन :
अधिक प्रमाणात मद्याचे सेवन शरीराला घटक असते. अधिक मद्य पिल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. मद्याच्या अधिक सेवनाने तोंडाचा, लिवरचा, स्तनाचा कॅन्सर होतो. कमी प्रमाणात मद्य सेवन केल्यास हा धोका घटतो. मात्र मद्य सेवन टाळल्यास उत्तम.
प्रोसिड, पॅक फूड :
जास्त प्रमाणात प्रोसिड आणि पॅक फूड खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. आजकाल तरुण वर्ग पॅक फूड जास्त प्रमाणात खातो. असे पदार्थ वजन वाढवतात आणि वजन वाढल्याने कॅन्सर होण्याचा धोका अधिक संभवतो.
अपायकारक पदार्थांचे सेवन :
कॅन्सरला दूर ठेवायचे असेन तर आपल्या खानपानाची सवय बदलणे आवश्यक आहे. जेवणात जंक फूड, पॅक फूड, स्ट्रीट फूड पदार्थांचा समावेश कमी असावा. कारण यात अनावश्यक फॅट, कोलेस्ट्रॉल आणि कॅलरी याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे भाज्या, फळे, डाळी अशा चांगल्या पदार्थांचे सेवन करावे.