दमा (Asthama) हा फुफ्फुसांशी संबंधित श्वसनसंस्थेचा एक विकार आहे. यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे दमा असणाऱ्या रुग्णांनी नेहमी मोकळ्या, हवेशीर वातावरणात राहावे. तसेच सकाळी मोकळ्या हवेत फिरायलाही जावे. दम्याच्या रुग्णांसाठी याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय आहेत. जाणून घ्या दमा आजारावरील घरगुती उपाय

मोहरीचे तेल (Mustard oil)
मोहरीच्या तेलात मीठ टाकून छाती चोळून, गरम पाण्याने शेकावे यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते.

दालचिनी, दूध आणि मध (Cinnamon, milk and honey)
दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून सेवन करावे.

खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी (Granulated sugar, raisins and cinnamon)
खडीसाखर, खिसमिस आणि दालचिनी चावून खाल्ल्याने दम्याचा त्रास कमी होतो.

पाण्याची वाफ घ्यावी (Steam the water)
दम्याच्या रुग्णांनी नियमितपणे स्टीमरने पाण्याची वाफ घ्यावी. यामुळे कफ कमी होतो. तसेच श्वास घेण्यास अडथळे येत नाहीत.

तूप (Ghee)
नाभीवर दिवसातून दोन-तीन वेळा तूप लावा. यामुळे श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होईल.

योगा आणि प्राणायम (Yoga and pranayama)
दमा असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे सूर्यनमस्कार घालावेत. प्राणायाम करावे. श्वसनाशी संबंधित इतर व्यायामही करावेत.

कोमट पाणी (Warm water)
शक्य असल्यास दम्याच्या रुग्णांनी कोमट पाणी प्यावे. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते.

( टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. माझं आरोग्य याची पुष्टी करत नाही. )

स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय