दमा (Asthama) विषयी जनजागृती करण्यासाठी मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. जाणून घ्या दमा (म्हणजे काय, दम्याची लक्षणे, दमा होण्याची कारणे, दम्याचा त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी –

दमा म्हणजे काय (What is asthma)

दमा हा श्वसनसंस्थेचा एक विकार आहे. यामध्ये रुग्णास श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. दमा हा आजार संसर्गजन्य नाही. दम्याची लागण दुसऱ्यास होत नाही.

दम्याची लक्षणे (Asthma symptoms)

* श्वास घेताना त्रास होणे,
* दम लागणे,
* बैचेनी वाटणे,
* बोलताना त्रास होणे,
* रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे,
* छातीत कफ होणे

दमा होण्याची कारणे (Causes of asthma)

* कफ आणि वात
* अनुवंशिकता
* आई- वडिलांपैकी एकाला खोकला किंवा दम्याचा त्रास असणे किंवा त्यांच्यात कफ-वातदोषाचे असंतुलन असणे.
* श्वसनाशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या संसर्गामुळे
* वातावरणातील ॲलर्जीक घटकामुळे (उदा. धूळ धूर , थंड पदार्थ – आईसक्रीम , शीतपेय , कुत्रा-मांजराचे केस,
* सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहणे (एसी, कूलर)
* श्वसनसंस्थेची ताकद कमी असणे
* फुलांचे पराग कण , मॉर्टिन/ कासव छाप क्वाईलचे धूर, थंड हवा)
* ताप, सर्दी, फ्लू, ब्रॉन्कायटिस, घशाला सूज येणे यांसारखे आजारही बालदम्याला कारणीभूत ठरू शकता.

दम्याचा त्रास होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी (What to do to prevent asthma)

* नेहमी मोकळ्या, हवेशीर वातावरणात राहावे.
* ‎धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे
‎* दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत
* व्हिटॅमिन ए आणि डी युक्त आहार घ्यावा
* वैद्यकीय सल्ल्याने औषोधोपचार करावे.

रांजणवाडी येण्याची कारणे आणि घरगुती उपाय