आजकाल दम्याचा त्रास (Asthama) असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कफ आणि वात, अनुवंशिकता, वातावरणातील ॲलर्जीक घटकामुळे, श्वसनाशी संबंधित असलेल्या विविध प्रकारच्या संसर्गामुळे, सातत्याने वातानुकूलित वातावरणात राहिल्याने दमा होण्याची शक्यता असते. मात्र काही उपाय, प्रतिबंध आणि काळजी घेतली तर दम्याच्या त्रासापासून मुक्ती मिळवता येते. जाणून घ्या दम्याच्या रुग्णांनी कोणत्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. (What foods should asthma patients avoid consuming)
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ (Milk and dairy products)
दूध आणि पदार्थांमुळे फुफ्फुसांमध्ये कफ तयार होतो. त्यामुळे शक्यतो दम्याच्या रुग्णांनी दूध आणि पदार्थांचे सेवन टाळावे.
तळलेले पदार्थ (Fried foods)
तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ यांसारख्या पदार्थांनी दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. तसेच तळलेल्या पदार्थांमुळे घास बिघडण्याचीही शक्यता असते.
व्हेजिटेबल ऑईल (Vegetable Oil)
तेलाच्या या प्रकाराचा वापर सहसा सलाड किंवा केकच्या ड्रेसिंगसाठी केला जातो. यामध्ये असणारी रसायनं शरीरात जळजळ आणि सूज वाढवतात.
ड्रायफ्रुटस, मासे, थंड पाणी-पदार्थ (Dry fruits, fish, cold water)
दम्याच्या रुग्णांनी ड्रायफ्रुटस सारख्या कोरड्या पदार्थांपासून तसेच थंड पाणी, मासे यांसारख्या थंड पदार्थांपासून दूर राहावे.
आर्टीफिशिअल स्वीटनर (Artificial Sweetener)
डाएट सोडा आणि ज्यूसमध्ये यामध्ये आर्टीफिशिअल स्वीटनरचा वापर केला जातो. आर्टीफिशिअल स्वीटनरपासून तसेच साठवणीतल्या अन्नपदार्थांपासूनही दम्याच्या रुग्णांनी दूर राहावं.
रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न (Chemically processed food )
प्रोसेस्ड फूड, रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये कृत्रिम कॅलरीचा वापर केलेला असतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी प्रोसेस्ड फूड, रासायनिक प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे. उदा. क्लोड्रींक्स, वेफर्स