वर्ल्ड एड्स डे 1988 पासून 1 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या रोगावर अजून कोणतेही औषध सापडलेले नाही. ह्यूमन इम्यूनो डेफिशिअन्सी व्हायरस शरीरात गेल्यानंतर माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. एचआयव्ही पॉसिटीव्ह आहे हे समजल्यानंतर साधारण 8 ते 10 वर्षानंतर एड्सची लक्षणे दिसू लागतात. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे दिसतात. तेव्हा ती सर्दी किंवा फ्लूसारखी असू शकतात. एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर योग्य औषोधोपचारामुळे हा कालावधी वाढवता येऊ शकतो. नियमितपणे औषधं घेतलीत तर एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती सामान्यपणे आयुष्य जगू शकते. एचआयव्ही बाधित प्रत्येकाला एड्स होत नाही.

एचआयव्हीची लक्षणे

हळूहळू वजन कमी होणं
सतत घसा खवखवणं
सतत थकवा येणं
सतत ताप येणं
भूक कमी लागणं

एड्स आणि एचआयव्हीमधील फरक

एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. हा थेट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या टी सेल्सवर हल्ला करतो. तर एड्स एक मेडिकल सिंड्रोम आहे. एचआयव्ही इन्फेक्शन झाल्यानंतर सिंड्रोम बनतो. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते. एचआयव्हीची लागण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होऊ शकते पण एड्सचा संसर्ग अजिबात होत नाही.

एड्सची लक्षणे

एड्सच्या सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ताप, थकवा, कोरडा खोकला, वजन कमी होणे, कालांतराने स्मरणशक्ती कमी होणे, रात्री घाम येणे आणि अंगदुखी ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.

मक्याचे कणीस खाण्याचे फायदे