जगभरात ‘एड्स’ या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा करण्यात येतो. हा आजार ह्यूमन इम्युनो डेफिशियन्स (HIV) व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. एचआयव्ही पॉसिटीव्ह किंवा एड्सग्रस्त लोकांना मदत करणे आणि एड्सशी संबंधित गैरसमज दूर करून लोकांना शिक्षित करणे हा दिन साजरा करण्याचा उद्देश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एड्स ग्लोबल कार्यक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जागतिक एड्स दिवस साजरा करण्याचा विचार मांडला होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या जिनेव्हा येथिल जागतिक कार्यक्रमात ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी या दिनाची संकल्पना मांडली. जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला. तेव्हापासून १ डिसेंबर १९८८ पासून वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. ‘असमानता संपवा, एड्स संपवा’ ही यावर्षीची जागतिक एड्स दिनाची थीम आहे.

जागतिक एड्स दिनाचा उद्देश

जागतिक एड्स दिनाचा उद्देश एड्स टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणे, या आजाराने ग्रस्त असणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे, एचआयव्ही ग्रस्त लोकांशी भेदभाव थांबवणे आणि लोकांना या आजाराविषयी जागरूक करण आहे.