संतुलित आहाराला चांगल्या आरोग्याची आधारशिला मानले जाते. यात दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतात. अनेकदा महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. कारण महिला घरातील काम ऑफिसचे काम यामुळे स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. नुकताच महिला दिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे आज आपण महिलांच्या आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत. असे कोणते उपाय आहेत जे महिलांना आरोग्यदायी ठेवतील. चला तर मग आपण ते उपाय जाणून घेऊयात.
हिरव्या पालेभाज्या :
आहार तज्ज्ञांच्या मते, सर्व महिलांना दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या अवश्य खायला हव्या. लोह, व्हिटॅमिनने भरपूर असलेली पालक, मेथी यांसारख्या भाज्या शरीराला अनेक लाभ पुरवतात. पालेभाज्या खाल्याने हाडे देखील मजबूत होतात. तसेच पालक खाल्याने महिलांचे ऍनिमिया सारखे आजार ही नियंत्रणात राहतात.
दूध आणि डेरी उत्पादने :
महिलांमध्ये वय वाढायला लागल्यावर हाडे ठिसूळ होण्याच्या समस्या वाढतात. यामुळे अशक्तपणा येणे, गाठी होणे अशा समस्या येतात. यापासून स्वक्तदाचे संरक्षण करण्यासाठी दूध आणि डेरी उत्पादने सेवन करावीत. यात कॅल्शिअम, पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी 12 याचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे तुमची हाडे, दात, त्वचा आरोग्यदायी राहते. दह्यातील प्रो बायोटिक्स जेवण पचण्यास मदत करतात. पनीरचे सेवन प्रोटिनची कमतरता कमी करतात.
ड्राय फ्रुटस :
चांगल्या आरोग्यासाठी मह8लानी आपल्या आहारात ड्राय फ्रुटसचा समावेश करावा. यात व्हिटॅमिन, खनिजे याचे भरपूर प्रमाण असते. जे तुमच्या शरीराला गुणकारी ठरतात. तसेच यामुळे बुद्धीही तल्लख होते. बदामातील घटक शरीरातील हाडे मजबूत करतात. तर अक्रोड मध्ये ओमेगा 3 या फॅटची मात्र चांगली असते. दररोज एक मूठभर ड्राय फ्रुटस खाल्याने आरोग्य सुधारते.