माझं आरोग्य (Mazarogya) : महिलांचे शरीर वाढत्या वयाबरोबरच कमकुवत होत जाते. वयानुरूप महिलांना अनेक आजार उद्भवताना दिसतात. खरंतर असे अनेक गंभीर आजार असतात ज्याचा सामना महिला करत असतात. परंतु त्याबद्दल त्या कधी सांगत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात. मात्र, असे करणे महिलांच्या जीवाला धोका निर्माण करणारे ठरू शकते. त्यामुळे महिलांनी किमान खालील पाच आजारांकडे तरी दुर्लक्ष करू नये. कोणते आहेत हे आजार आपण जाणून घेऊयात. (Women health care)
ब्रेस्ट कॅन्सर (brest cancer)
ब्रेस्ट कॅन्सरकडे महिला अनेकदा दुर्लक्ष करतात. सध्या हा आजार महिलांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढताना दिसतो. मात्र, अनेकदा महिलांना या आजाराची लक्षणे ठाऊक नसतात. किंवा इतरांना ते त्याचा वेदनांबद्दल सांगत नसतात. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्तनामध्ये असह्य वेदना होत असतात. त्यामुळे स्तनातून एक प्रकारचा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या लक्षणांकडे लक्ष न दिल्यास ब्रेस्ट कॅन्सर
अधिक गंभीर होत जातो.
जाणून घ्या H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसची लक्षणे, संसर्ग होण्याची माध्यमे आणि उपाय
नैराश्य (depression)
नैराश्याचा सामना केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही करावा लागतो. महिलांना घरातील अडचणी, कामाचा ताण यातून नैराश्य येते. परंतु महिला याबाबत बोलणे टाळतात. त्यामुळे त्या बऱ्याचदा एकटे राहतात. मात्र, नैराश्याकडे गांभीर्याने पाहून त्यावर उपचार करणे आवश्यक असते.
यूट्राइन फायब्रॉइड्स (uterine fibroids)
यूट्राइन फायब्रॉइड्स या आजारामुळे महिलांच्या गर्भाशयात ट्यूमर वाढतो. या आजाराकडे महिला दुर्लक्ष करतात. मात्र, अनेकदा हा आजार कर्करोगाचे स्वरूपही घेतो. मासिक पाळीची अनियमितता, हार्मोन्सचे असंतुलन या समस्या या आजाराची लक्षणे आहेत.
एंडोमेट्रिओसिस (endometriosis)
एंडोमेट्रिओसिसमुळे महिलेच्या गर्भाशयाच्या रेषा आत वाढण्याऐवजी बाहेरच्या दिशेने वाढतात. यातून फॅलोपियन ट्यूब विकसित होतात. ज्यामुळे स्त्रियांना वेदना होतात.
धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी
मॅनोरेजिया (Menorrhagia)
मॅनोरेजिया हा आजार मासिक पाळी दरम्यान ७ किंवा अधिक दिवस रक्तस्त्राव झाल्यामुळे होतो. या आजारामुळे शरीरातून खूप रक्त वाहते. यामुळे महिलांमध्ये अॅनिमियासारख्या समस्याही उद्भवतात.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)