दह्याला सुपरफूड म्हणले जाते. दुधापेक्षाही अधिक पौष्टिक घटक दह्यात असतात. दही (curd) जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मात्र रात्री दही खाणे टाळावे. आयुर्वेदानुसार आणि पोषणतज्ज्ञांच्या मते, रात्री दही खाणे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या रात्री दह्याचे सेवन केले तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो –
पचनतंत्रावर परिणाम (Affects Digestion)
रात्री शरीराचे पचनशक्ती तुलनेत मंदावते. दही थंड आणि जड असल्याने ते नीट पचत नाही, त्यामुळे गॅस, अपचन, फुगणे हे त्रास होऊ शकतात.
ॲसिडिटी (Acidity Risk)
रात्री दह्याचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अजिबात पचत नाही. अन्न पचले नाही तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याचीही शक्यता असते.
कफ दोष वाढतो (Increases Kapha Dosha)
आयुर्वेदानुसार रात्री दही खाल्ल्यामुळे कफ दोष वाढतो, त्यामुळे शरीरात जडपणा, आळस आणि अकार्यक्षमता जाणवू शकते.
त्वचेच्या समस्या (Skin Issues)
दह्याचे सेवन दररोज रात्री केल्यामुळे शरीरातील सीबमचे प्रमाण वाढते. सीबमचे प्रमाण वाढल्यामुळे आपोआप त्वचेवर पिंपल्स यायला लागते.
काही लोकांमध्ये रात्री नियमितपणे दही खाल्ल्याने त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जीसारखे त्रासही होऊ शकतात.
श्वसन संस्थेवर परिणाम (Respiratory Problems)
दम्याचे किंवा श्वसनाच्या तक्रारी असलेल्या लोकांनी रात्री दही टाळावे, कारण ते श्वसनमार्गात कफ साचण्यास कारणीभूत ठरते.
सर्दी-खोकला वाढणे (Cold and Cough)
दही हे थंड प्रवृत्तीचे अन्न असल्याने रात्री त्याचे सेवन केल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास वाढू शकतो.