केळ (Banana) हे एक परिपूर्ण आणि सहज उपलब्ध होणारे फळ आहे. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फायबर यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. रोजच्या आहारात केळीचा समावेश केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या दैनंदिन आहारात केळीचा समावेश का करावा याविषयी माहिती –
हिमोग्लोबिन वाढते
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याकरता केळी खाणे उपयोगी आहे. केळीमध्ये थायमिन, फॉलिक ऍसिड आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.
हाडांचे आरोग्य सुधारते
केळीमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी नियमित केळी खावी.
पचनसंस्थेचे आजार कमी होतात
केळीमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे पचनसंस्थेसंबंधी व आतड्यांसंबंधी आजारांमध्ये केळी गुणकारी आहे. बद्धकोष्ठता आणि मलावरोधाची समस्या असेल तर केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर्स असतात. त्यामुळे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते. तसेच फायबर्समुळे पचनकार्य सुरळीत सुरू राहते.
वजन वाढविण्यासाठी उपयुक्त
जेवणानंतर केळी खाल्ल्यास वजन वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात. वजन वाढत नसेल तर आहारात केळीचा समावेश करावा.
स्त्रियांचे आरोग्य
केळी खाल्ल्यामुळे स्त्रियांचे मासिक चक्र व्यवस्थित राहण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो
केळी खाण्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मानसिक तणावापासून मुक्ती
केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन बी-6 आणि ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
डोळ्यांचे आरोग्य
केळीमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
थकवा दूर करते
शरीरात पोटॅशियमची पातळी चांगली असणे खरोखर महत्वाचे आहे कारण कमी पोटॅशियम पातळीमुळे स्नायू पेटके, थकवा आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.
केळी खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील थकवा निघून जातो.
डोकेदुखीची कारणे व त्यावरील घरगुती उपाय
पुदिन्याचे तेल घरी आणूणच ठेवा! डोकेदुखी, केस, त्वचेसंबंधित समस्यांवर आहे अत्यंत गुणकारी