अनेकांना धुळीपासून अ‍ॅलर्जी होते. त्यामुळे सर्दी, खोकला, शिंका येतात. तसेच डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्या जाणवतात. आजकाल धूळ, धूर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच शहरीकरणामुळे नैसर्गिक मोकळी हवाही शरीराला मिळत नसल्याने माणसाची शरीरप्रकृती नाजूक होऊ लागली आहे. त्यामुळे धूळ, धूर, परागकण यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात आल्याने अनेकांना अ‍ॅलर्जी होते.

धुळीची अ‍ॅलर्जी होण्याची कारणे
आपलं शरीर धुळीचे कण, बॅक्टेरिया किंवा कोणतीही अनैसर्गिक वस्तू सहन करत नाही. धुळीचे कण श्वासाद्वारे शरीरात जातात तेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. शरीरात अ‍ॅंटीबॉडी तयार होतात त्याची प्रतिक्रिया म्हणजे शिंक येणे, नाक वाहने अशा समस्या निर्माण होतात.

अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास
श्वास घेण्यास त्रास होणे, घशात खवखव होणे, खोकला येणे, डोळ्यांना सूज येणे, शिंका येणे, नाक वाहने, त्वचेला खाज येणे, त्वचेची जळजळ होणे यांसारख्या समस्या अ‍ॅलर्जीमुळे निर्माण होऊ शकतात.

अ‍ॅलर्जीवर घरगुती उपाय
अ‍ॅलर्जीपासून वाचायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे शक्यतो धुळीच्या संपर्कात येणे टाळा. अ‍ॅलर्जीमुळे त्रास होऊ नये म्हणून यावर काही घरगुती उपाय देखील आहेत.

  • लॅव्हेन्डर ऑईल
    लॅव्हेन्डर ऑईलमध्ये अ‍ॅन्टी-इम्फ्लामेन्ट्री आणि अ‍ॅनाल्जेसिक गुणधर्म असतात. लॅव्हेन्डर ऑईलचे ४-५ थेंब गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घ्या.
  • मध
    तुम्हाला धुळीच्या अ‍ॅलर्जीचा त्रास होत असेल तर मध खा. यासाठी दररोज दोन चमचे मध खात जा. मधामध्ये दाहकविरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात.
  • हळद
    तुम्हाला धुळीची अ‍ॅलर्जी झाली तर हळद घ्या. एका ग्लासमध्ये दुध घेऊन त्यात हळद मिक्स करा. नंतर ते उकळा. त्यात चिमूटभर काळी मिरी आणि मध टाका. नंतर ते प्या. हळदमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे आराम मिळतो.
  • सफरचंद व्हिनेगर
    जर तुम्हाला धुळीपासून अ‍ॅलर्जी होत असेल तर सफरचंद व्हिनेगरचा वापर करा. त्यामुळे नक्की फरक जाणवेल. त्यासाठी ग्लासात कोमट पाणी घ्या. त्यात दोन चमचे सफरचंद व्हिनेगर टाका. तुम्ही त्यात मधही टाकू शकता. नंतर ते मिश्रण प्या. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते.
  • नीलगिरी तेल
    अ‍ॅलर्जी पासून सुटका मिळवण्यासाठी नीलगिरी तेलाचाही वापर होतो. त्यासाठी पाणी गरम करा. नंतर या तेलाचे 4-5 थेंब त्यात टाका. नंतर याची वाफ घ्या. या तेलामध्ये दाहक-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्म असतात.
  • कोरफडीचा ज्यूस
    धुळीच्या अ‍ॅलर्जीवर हा सर्वोत्तम उपाय आहे. कोरफडीचा आतील गर काढा. त्यात पाणी मिसळा. नंतर मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस तयार करा. ते प्या. कोरफडीत जीवाणू आणि फंगस नष्ट करणारे गुणधर्म असतात. हे अ‍ॅलर्जीमुळे होणाऱ्या सर्व समस्या कमी करण्यास मदत करतात.

टीप – धुळीची अ‍ॅलर्जी असणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र अधिक किंवा नेहमीच त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मशरूम खाण्याचे फायदे

जाणून घ्या मखानातील पोषक घटक आणि औषधी गुणधर्म याविषयी