जेवल्यानंतर अनेकांना पोटात जडपणा किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवते. जेवणानंतर पोट फुगणे (bloating) ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात – उशिरा जेवणं, पचायला जड अन्न, फास्ट फूड, गॅस्ट्रिक समस्या किंवा अपचन. या समस्येवर काही घरगुती उपायांनी नक्कीच फरक जाणवतो.
फायबरयुक्त पदार्थ (Fiber-rich foods)
बद्धकोष्ठतेच्या समस्येने पोट फुगले असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यासाठी बीन्स, सोललेली बटाटे, बिया आणि काजू इत्यादी पदार्थ खाऊ शकता.
पुदिना चहा (Peppermint tea)
जेवण केल्यानंतर जेव्हाही तुम्हाला आपलं पोट फुगलं आहे असं वाटतं तेव्हा पुदिनाच्या चहाचं सेवन करा. यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होते. शिवाय शरीर हायड्रेट राहते.
जिरे पाणी प्या (Drink cumin water)
अर्धा चमचा जिरे पाण्यात उकळून ते कोमट पाणी जेवणानंतर प्यायल्याने पचन सुधारते व गॅस कमी होतो.
हिंग (Asafoetida (Hing))
चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटातील गॅस आणि फुगवट्यात आराम मिळतो.
कोथिंबीर व पुदिना चटणी (Coriander & Mint Chutney)
जेवणात ताज्या पुदिन्याची व कोथिंबीरीची चटणी समाविष्ट केल्यास अपचन टळते.
त्रिफळा चूर्ण (Triphala powder)
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घेण्याने पचनसंस्थेला बळकटी मिळते.
हायड्रेटेड राहा (Stay hydrated)
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी पाहिजे तेवढं पाणी प्यावं. तसेच पोट फुगण्याची समस्या असेल तर आपल्या आहारात द्रव पदार्थांचा समावेश करा. म्हणजे फळांचा ज्यूस, पाणी प्यावे.