HMPV (ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस) व्हायरसची सर्वाधिक प्रकरणे 4 ते 6 महिने वयोगटातील मुलांमध्ये आढळतात. भारतातही, बहुतेक प्रकरणे 1 वर्षाखालील मुलांमध्ये दिसून आली आहेत. जाणून घ्या HMPV संसर्गाचा लहान मुलांना अधिक धोका का आहे याविषयी माहिती –

आईकडून आलेली इम्युनिटी ही पहिल्या सहा ते बारा महिन्यांमध्ये हळूहळू संपते. त्यामुळे HMPV च नाही तर कुठल्याही व्हायरल आजारांची तीव्रता लहान मुलांमध्ये जास्त असते.

लहान मुलांमध्ये होणाऱ्या कॉमन व्हायरल इन्फेक्शन्सपैकी HMPV एक आहे. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे बाळाला जेव्हा पहिल्यांदा HMPV च इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याची लक्षणं आणि तीव्रता जरा जास्त असू शकते.

लहान मुलांची प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये संसर्गाची अधिक प्रकरणे दिसून आली आहेत.