माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : जास्त मीठ खाणे आरोगयासाठी धोकादायक असते. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) मीठ खाण्यासंदर्भात एक धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे. ज्यात मीठाच्या सेवनामुळे २०३० पर्यंत ७ मिलियन लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे भाकीत करण्यात आले आहे. (WHO salt effect)
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
डब्ल्यूएचओच्या मते, आजारांचे ओझे कमी करण्यासाठी दिवसाला फक्त ५ ग्रॅम किंवा एक चमचा मीठाचा वापर करावा. मीठाच्या अधिक सेवनामुळे ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांमुळे मृत्यूचा धोका वाढतो. जागतिक आरोग्य संघटनेने मीठाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला होता.
तज्ज्ञांच्या मते, मिठाच्या अतिसेवनामुळे स्ट्रोक आणि इतर ह्रदय व रक्तवाहिन्यांशीसंबंधित रोगांचा धोका वाढतो. जास्त मिठाच्या सेवनामुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. याशिवाय हाडे कमकुवत होऊ शकतात. भारतीयांनी दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचे सेवन करु नये. हे प्रमाण लिंग, आरोग्य स्थितीनुसार बदलते. पण गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या लोकांनी दिवसा किमान ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे, असे अहवालात म्हणले आहे.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
तज्ज्ञांच्या मते, काही कालावधीत जास्त मीठयुक्त आहार घेतल्याने अनेक अवयव आणि शरीराचे कार्य खराब होते. मिठाच्या अतिसेवनाचे अल्प आणि दीर्घकालीन परिणाम होतात.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)