अनेक जण चष्माला पर्याय म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात तर, काही लोक कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर फॅशन म्हणून करतात. मात्र डोळ्यांसाठी लेन्सचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. कारण डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक आणि महत्वचा अवयव आहे, शिवाय आपल्या शरीराला कोणत्याही अनैसर्गिक वस्तू सहन होत नाहीत. कॉन्टॅक्ट लेन्सच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास किंवा त्या डोळ्यात घातल्यानंतर योग्य प्रकारे न हाताळल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून जाणून घ्या कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना कोणती काळजी घ्यावी

डोळ्यांच्या तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे
आय स्पेशालिस्टकडे डोळे तपासून त्यांच्या सल्ल्यानेच शक्यतो लेन्स घाव्यात. म्हणजे कोणत्या प्रकारच्या लेन्स घ्यायच्या आहेत, किती दिवस आणि कशा प्रकारे वापरायच्या आहेत याविषयीही सविस्तर मार्गदर्शन मिळेल. तसेच लेन्सचे फिटिंगही तपासून घ्यावे.

कॉन्टॅक्ट लेन्स घालण्यापूर्वी काळजी घ्या
प्रथम लेन्स साफ करण्याच्या सोल्युशनने व्यवस्थित साफ कराव्यात नंतर पाण्याने साफ कराव्यात.
लेन्स घालण्याआधी डोळे व हात स्वच्छ धुवावेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यात घालण्यापूर्वी बोटाची नखे व्यवस्थित कापलेली असावीत, अन्यथा अनावधानाने डोळ्यांना इजा होऊ शकते.

झोपताना लेन्स वापरू नका
लेन्स लाऊन झोपल्याने डोळ्यातील ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. तसेच झोपेत नकळत डोळे चोळण्याची शक्यता असते त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

पाण्यात जाताना लेन्स वापरू नका
लेन्स घातल्यानंतर डोळे पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नये. पाण्यात असणारे बॅक्टेरिया लेन्सला चिकटण्याची शक्यता असते.

लेन्स लावून धूर, धूळ आणि उष्णता असणाऱ्या वातावरणात जाऊ नये
लेन्स लावून गॅस, विस्तव, शेकोटी, धूर, धूळ आणि उष्णता असणाऱ्या वातावरणात जाऊ नये. धूर, धूळ आणि उष्णता यामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते.

डोळ्यांचा अती मेकअप करू नये
डोळ्यांच्या मेकअपमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. चष्म्याच्या आड मेकअप दिसत नाही म्हणून अनेकजण लेन्स वापरून डोळ्यांचा मेकअप करतात. लेन्स घालत्यानंतरही शक्यतो डोळ्यांवर अति सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे टाळा. पापण्यांच्या जास्त जवळ आय लायनर लावू नका. लिक्विड आय लायनर ऐवजी पेन्सिल आय लायनरचा वापर करा. तसेच आय मेकअप केल्यानंतर सेटिंग स्प्रे वापरू नका.

लेन्सची व्यवस्थित स्वछता राखावी
लेन्स सुरक्षित व जंतू विरहित ठेवण्याकरता लेन्स केसच वापरा. दर २ महिन्याला लेन्स केस बदला. लेन्स डबीत ठेवताना अंतर्गोल असणारा भाग वरच्या बाजूस राहील असा ठेवावा. लेन्स कापडाने अथवा कागदाने पुसू नये. उत्तम प्रतीचे लेन्स सोल्युशन लेन्स साफ करण्यासाठी वापरा. लेन्स काढल्यावर डबीत ठेवाव्यात. सेमी सॉफ्ट आणि लेन्स नेहमी सोकिंग सोल्युशनमध्ये बुडवून ठेवाव्यात.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी योगासने