कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच प्लाझ्मा दान करण्याची अनेकांची इच्छा आहे. परंतु प्लाझ्मा दान करण्याआधी त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
* प्लाझ्मा म्हणजे काय?
प्ला्झ्मा हा रक्तातातील एक पिवळसर द्रव घटक असून त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे 55 टक्के इतके असते. त्यात जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात.
*प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?
एखादा व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याचा 28 दिवसांनंतर प्लाझ्मा काढून कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी.
* हा प्लाझ्मा कोन दान करू शकतं?
जी व्यक्ती कोरोनातून पूर्णपणे बरी झाली आहे, ज्या व्यक्तीचं वय 18 ते 60 दरम्यान आहे. तसेच ज्यांचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे ती व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते.
*एकदा प्लाझ्मा दान केल्यावर पुन्हा रक्तदाता कधी प्लाझ्मा दान करू शकतो?
एकदा प्लाझ्मा दान केल्यावर रक्तदाता 7 ते 15 दिवसांनंतर पुन्हा दान करू शकतात.
*प्लाझ्मा दान केल्याने दुष्परिणाम होतात का?
तर प्लाझ्मा दान केल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कारण रक्तदात्याने दान केलेला प्लाझ्मा शरीर काही तासांत पुन्हा तयार करते.
* प्लाझ्मा दान करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?
योग्य पौष्टीक आहार घ्या. तसेच पुरेशी झोप घ्या. शक्यतो द्रव पदार्थांचे सेवन जास्त करा. तसेच महत्त्वाचे म्हणजे सध्या आणि तत्पूर्वी असलेल्या आजाराबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या औषधांबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्या.
*कोरोनातून बरी झालेली व्यक्ती कधी प्लाझ्मा दान करू शकते?
कोरोनातून पूर्णपणे बरी झालेली व्यक्ती 3- 4 महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. (पहिले 14 दिवस आणि बरे झाल्यानंतरचे 28 दिवस सोडून नंतर)