देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच कोरोनाची सर्वसामान्य लक्षणं जरी आढळली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच कोरोना चाचणी करावी लागत आहे. परंतु कोरोना चाचणीबद्दल अनेकांना माहिती नाही. विशेष म्हणजे कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती चाचणी करावी आणि कोणत्या टेस्ट केल्या जातात याबद्दल अनेकांना माहिती नाही. मग जाणून घ्या कोरोना चाचण्यांबद्दल सर्वकाही…

*अँटीबॉडी टेस्ट किट-
या टेस्टमध्ये तुमच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी किती अँटीबॉडी आहेत हे तपासता येतं.

*अँटीजन टेस्ट किट-
या चाचणीमध्ये तुमच्या नाक व घसा यामधून तपासणीसाठी काही सॅम्पल घेतले जातात. यात विषाणूवर असलेल्या एका खास प्रोटीनचा थर किती आहे ते लक्षात येतं.

*आरटी पीसीआर टेस्ट-
या टेस्टमध्ये डीएनए आणि आरएनएची चाचणी केली जाते. एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याची चांगली पद्धत असल्याचं बोललं जातं. परंतु काही वेळा यात चुकीचा रिपोर्ट येण्याचीही शक्यता असते.

* कोरोना टेस्ट कधी करावी?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना टेस्ट कधी करावी. ज्यावेळी आपल्याला अशक्तपणा, ताप, अंगदुखी, चव न लागणे, वास न येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे आणि जुलाब होणे या सारखा त्रास जाणवू लागला तर लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी. ही चाचणी सरकारी रूग्णालयात मोफत केली जाते. तर खासगी रूग्णालयात यासाठी पैसे द्यावे लागतात.