पोटाचे स्नायू दुर्बल झाल्यामुळे, वजनं उचलल्यामुळे पोटावर आलेल्या ताणामुळे, लठ्ठपणामुळे, अनुवंशिक कारणांमुळे तसेच स्नायूंवर ताण आल्याने हर्निया होतो. कधीकधी हर्निया जन्मजात असल्याचंही दिसून येतं. हर्निया म्हणजे शरीरातल्या आतल्या भागात एखादा अवयव दुर्बल झालेल्या स्नायूतून किंवा उतींच्या आवरणातून बाहेर ढकलला जाणे.
हर्नियाची लक्षणे
बहुतेक वेळा हर्नियाची लक्षणं दिसत नाहीत. मात्र याचा अचानक त्रास होतो. हर्नियाच्या रुग्णांमध्ये साधारणपणे खालील लक्षणे दिसतात –
ओटीपोटात अचानक तीव्र वेदना होणे.
श्वास घेण्यास त्रास होणे,
वारंवार उलट्या होणे
हर्नियाचा गोळा टणक आणि वेदनादायक होणे
हर्नियाच्या रुग्णांसाठी आहार आणि पथ्य
हर्नियाच्या रुग्णांनी अतिमसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ टाळावेत.
हर्नियाच्या रुग्णांनी मद्यपान आणि धूम्रपान बंद केले पाहिजे. कारण त्यामुळे पोटातील उती कमकुवत होत असतात.
हर्नियाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी फळं, संपूर्ण धान्य, सुकामेवा, बिया आणि तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स असलेले पदार्थ आहारात जास्त घ्यावेत.
हर्नियाच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यावं. द्रव पदार्थ पोटात जातील याची काळजी घ्यावी.
हर्नियाचा त्रास असणाऱ्या रुग्णां पोट काठोकाठ भरेल, ताण येईल असे जेवण करू नये.