कीटो डाएटमध्ये लो कार्ब फॅटचा समावेश असल्यामुळे वजन आणि चरबी मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होते. कीटो डायटला कीटोजेनिक डायट, लो-कार्ब डायट आणि लो-कार्ब हाय फॅट डायट देखील म्हणतात. कीटो डायटमध्ये फॅट – ७० टक्के, प्रोटीन – २५ टक्के, कार्ब्स – ५ टक्के असा रेशो असतो. या डाएटमध्ये शरीराला फॅट्समधून ऊर्जा मिळते तर कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्सचं सेवन अतिशय कमी किंवा नियंत्रित प्रमाणात केलं जातं. या डायटमुळे शरीरामध्ये साठलेली अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचे सेवन अधिक असून, या स्निध पदार्थांचे चयापचय होत असताना कीटोन्स नामक कंपाउंड तयार होत असतात. शरीराला सक्रीय राहण्याकरिता जी उर्जा आवश्यक आहे ती या कीटोन्सकडून मिळत असते.
किटो डाएटमध्ये या पदार्थांचा होतो समावेश
ॲवोकॅडो , स्टॉबेरी सारखी फळे, रेडमीट, चिकन, मटण, सुरमई आणि टूना मासा, ऑलिव्ह ऑईल, ॲवोकॅडो ऑईल, नारळाचे तेल, अंडी, मीठ, काळीमिरी, स्टार्च नसलेल्या भाज्या, दूधाचे पदार्थ, प्रोटिनयुक्त पदार्थ, हिरव्याभाज्या आणि निरनिराळ्या डाळींचे प्रकार बदाम, अक्रोड, अळशी, भोपळ्याच्या बिया) यांसारख्या पदार्थांचे कीटो डायटमध्ये सेवन केले जाते.
किटो डाएटमध्ये कोणते पदार्थ टाळावेत
बटाटा, रताळी, गाजर यांसारखी कंदमुळे , पास्ता, चिप्स, फरसाण, बिस्किटे यांसारखे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सोडा, फळांचा रस, स्मूदी, केक, आईसक्रीम, चॉकलेट यांसारखे गोड पदार्थ, कार्बोहायड्रेट असलेली फळे हे पदार्थ किटो डाएटमध्ये टाळावेत.
टीप – कोणताही डाएट प्लान स्वीकारण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण डाएट केल्याने शरीराला जसे काही फायदे मिळतात तसेच साईडइफेक्ट देखील होतात.