* चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ८ तास झोप आवश्यक आहे. परंतु अतिप्रमाणात झोप घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही.

* अतिप्रमाणात झोपणाऱ्या व्यक्ती विसराळू बनतात.

* जास्त वेळ झोपल्याने मेंदू काल्पनिक आठवणींमध्ये गुंतून पडतो.

* काही लोकांना दिवसा झोपण्याची सवय असते. दिवसाची झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली नसते. दिवसा जास्त वेळ झोपल्याने आपले मन निरनिराळ्या, न घडलेल्या घटनांची कल्पना करू लागते. यामुळे माणसाला कधीकधी उदास वाटू शकते.

* जास्त वेळ झोपल्याने सुस्तपणा आणि आळशीपणा वाढतो. त्यामुळे इतर कामांसाठी वेळ कमी मिळतो. काम वेळेत पूर्ण होत नाहीत. परिणामी चिडचिड, मानसिक तणाव वाढतो.

* आठ तासापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना मधुमेह होण्याची शक्यता असते.

* अतिझोपेचा परिणाम हा ब्रेन ट्रांसमीटरवर होतो. तसेच डोके दुखीचा त्रासही होतो.

* अतिप्रमाणात झोपण्यामुळे लठ्ठपणा येतो.

* जास्त झोपण्याने मेंदू २ वर्षाने वृद्ध होतो.

* जास्त वेळ झोपल्यामुळे अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

रोज एक ‘आवळा’ खा आणि दीर्घायुषी व्हा