प्राणायाम शक्यतो रिकाम्यापोटीच करावा.
प्राणायम करताना आरामदायक कपडे घालावेत.
प्राणायम करताना साधी मांडी घालून, शरीर सैल सोडून बसावे. पाठ सरळ ठेवून बसावे.
प्राणायम करताना फुप्फूसावर,छातीवर जास्त ताण देऊ नये.
ज्यांना हृदयविकार, क्षयरोग, दमा किंवा फुप्फूसाचा विकार असेल त्यांनी प्राणायाम करू नये. त्याऐवजी दिर्घश्वसन करावे.
प्राणायाम सुरु करण्याची पद्धत
सर्वात आधी श्वास सोडून द्यावा. नंतर मनात 4 अंक मोजून होईपर्यंत श्वास आत घ्यावा. घेतलेला श्वास 16 अंक मोजून होईपर्यंत श्वास रोखून धरावा. 8 अंक मनात मोजत हळूहळू श्वास बाहेर सोडावा.
प्राणायम ठराविक वेळीच करावा असा काही नियम नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा प्राणायाम अवश्य करावे. मात्र प्राणायाम सकाळच्या वेळी केल्याने अधिक आणि जलद लाभ मिळतो. कारण सकाळी आपले पोट पूर्ण रिकामे असते. उपाशीपोटी प्राणायाम केल्यामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते. शिवाय सकाळी वातावरणामध्ये ताजी हवा असते. ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.