माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काही प्रमाण पुन्हा वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने केलेला कहर अजूनही विसरला जाऊ शकत नाही. कोणाला पहिल्या लाटेत तर कोणाला दुसऱ्या लाटेत कोरोना झाला. काहींही कोरोनामुळे आपल्या नातेवाईकांना गमावले. तर अनेकांना कोरोनानंतर काहीना काही साइड इफेक्ट्स जाणवायला लागले. कोरोनानंतर अनेकांना हृदयविकारासंबंधिक समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. खरंच कोरोना आणि हार्ट अटॅकचे काही कनेक्शन आहे का? याचे उत्तर दिले आहे स्वतः आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी…(heart attack and corona connection)

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

कलाकार, खेळाडूंचा हृदयविकाराने मृत्यू
मनसुख मांडविया म्हणाले की, कोरोना काळानंतरही अनेक कलाकार, खेळाडू यांचा मृत्यू परफॉर्मन्स देत असताना झाल्याचे आपण पाहिलं, वाचलं. त्यामुळे करोना आणि हार्ट अटॅक यांचा परस्पर काही संबंध आहे का? याबाबत संशोधन करण्याचे ठरविले आहे. या संदर्भातला अहवाल लवकरच येईल.

सतर्कता आवश्यक
कोरोनाची चौथ्या लाटेबद्दल मांडविया म्हणाले की, आपल्याला या लाटेसाठी सज्ज राहण्याची गरज आहे. मागच्या वेळी कोविड म्युटेशन ओमिक्रॉनचा बीएफ ७ हा सब व्हेरिएंट होता. आता XBB 1.16 या व्हेरिएंटमुळे रूग्ण वाढत आहेत. हा सब व्हेरिएंट खूप धोकादायक नाही. मात्र सतर्क रहावे लागेल.

हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

कोरोना-हार्ट अटॅकबाबत संशोधन
कोरोना हा सातत्याने त्याचे रूप बदलतो. आम्ही आता कोरोनाची चौथ्या लाटेसाठी सज्ज आहोत. कोरोना आणि हार्ट अटॅक यांचं काही कनेक्शन आहे का? यासाठी आम्ही आमच्या पातळीवर संशोधन करतो आहोत. त्याचा अहवाल पुढच्या दोन ते तीन आठवड्यात येईल, असे मांडविया यांनी सांगितले.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)