वजन किंवा जाडी कमी करण्यासाठी सर्वात आधी अनेकांना व्यायाम करण्याचाच सल्ला मिळतो. परंतु हा इतका सोपा टास्क नाही. अनेक दिवस यात सातत्य राखणे तसे काठीण. परंतु आम्ही तुम्हाला अशा ट्रिक्स सांगणार आहोत ज्या तुम्ही रोज अगदी ना चुकता फॉल्लो करू शकतात.

ही ट्रिक आहे आपला आहार संतुलित ठेवणे. यात डाएटिंगचा कोणताही समावेश नाही. फक्त तुम्हाला तुमच्या रोजच्या जेवणात आवश्यक प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा लागेल. या बदलाचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसायला लागेल.

जंक फूड पूर्णपणे बंद करणे :
जंक फूड लहानग्यांपासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत अपाय कारक आहे. करण त्यात फायबर, व्हिटॅमिन आणि इतर न्यूट्रिशनचे प्रमाण जवळपास नसते. या पदार्थात साखरेचे प्रमाण मात्र अधिक असते. ज्याचे अधिक सेवन झाल्यास वजन आणि चरबी वाढते. तसेच मधुमेह, हृदय विकार, रक्तदाब याच्याही समस्या जाणवतात.

तेलकट पदार्थ खाण्यावर नियंत्रण :
तेलकट पदार्थ खाण्यावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. वजन वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण शरीरात अपायकारक चरबी तयार होणे आणि स्लोव मेंटबॉलिसम. तेलकट पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. हे पदार्थ तुमच्या आहारातून कमी केल्यास वजन नक्की कमी होण्यास मदत होईल.

साखर आणि मीठ कमी खाणे :
साखर आणि मिठाचे जास्त प्रमाणात सेवन शरीर नुकसानकारक आहे. साखर जास्त असलेले पदार्थ पटकन वजन वाढवतात. जर तुम्ही मधुमेह आणि उच्च रक्तदाब याचे रुग्ण असाल आणि व्यायामशिवाय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर साखर आणि मिठाचे सेवन टाळणेच पाहिजे.

‘टायगर श्रॉफ’सारखे पिळदार शरीर कमवायचे आहे? पहा त्याचा ‘डाएट’ प्लॅन

नॅचरल तेलापासून असे बनवा ‘वॅसलीन’! तजेलदार होईल तुमची त्वचा