माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : उन्हाळा आला की आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात फळांचा अधिकाधिक समावेश असणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी उन्हाळ्यात कलिंगड फार उत्तम. परंतु, फक्त कलिंगडच नाही तर कलिंगडाच्या बियाही आपल्या शरिरासाठी गुणकारी ठरणाऱ्या असून या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. (Watermelon Seeds)
1. पचन क्रिया सुधारते
कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते. जर तुम्हाला पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर कलिंगडाच्या बियांचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
2. ह्रदय निरोगी राहण्यास मदत
कलिंगडाच्या बिया ह्रदयासाठीही खूप फायदेशीर असतात. या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड ह्रदयविकाराचा धोका कमी करते.
3. वजन घटवण्यास मदत
कलिंगडाच्या बिया वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
4. हाडे मजबूत होण्यास मदत
कलिंगडाच्या बियांमध्ये झिंक, फोलेट, पोटॅशियम, ओमेगा ३, फॅटी अॅसिड, प्रथिने, कॉपर हे नॅच्युरल मल्टीव्हिटामिन्ससारखे काम करतात, त्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांच्या मजबूतीसाठीही कलिंगडाच्या बिया खूप फायदेशीर असतात.
5. त्वचेला ग्लो
कलिंगडाच्या बिया बारीक करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते, शिवाय ब्लॅकहेड्सही दूर होतात. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)