माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : धकाककीच्या जीवनात आपण बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र भविष्यात त्याचा त्रास आपल्याला जाणवू लागतो. वयोमानानुसार अनेक आजार आपल्याला जडू लागतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता रोज किमान 10 मिनिटे तरी चालले किंवा धावले पाहिजे असा सल्ला डॉक्टर, तज्ज्ञ देतात. किमान 10 मिनिटे चालण्याचे आणि धावण्याचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात आपण जाणून घेऊयात…(Walking for at least 10 minutes)

चालण्याचे किंंवा धावण्याचे शरीरास होणारे फायदे
हृदय निरोगी राहते
– ह्रदय आणि रक्ववाहिन्यासंबंधित आजार दूर राहतात. तसेच हृदयाची गती, रक्ताभिसरण क्षमता वाढवते. याशिवाय शरीरातील कोलस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

मानसिक आरोग्य सुधारते
दररोज चालल्यामुळे चिंता, नैराश्य, ताण यापासून मनुष्य दूर राहतो. त्याचे आरोग्यावर आपसूक सकारात्मक परिणाम होतात. शिवाय दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि ऊर्जाही वाढते.

वजनावर नियंत्रित ठेवण्यास मदत
दररोज किमान 10 मिनिटे चालल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होते. शिवाय चयापचय क्रिया सुधारून वजन नियंत्रित राहते. चालणे हा उत्तम व्यायाम असल्याने सर्व वयोगटातील लोक हा सहज करू शकतात.

हाडे मजबूत होतात
चालण्याच्या व्यायाम नित्यनियमाने केल्याने हाडे मजबूत होतात. त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका घटतो.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते
दररोज चालल्याने पांढऱ्या रक्त पेशी योग्य प्रमाणात वाढवून रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. यामुळे व्हायरल आजाराशी लढण्यास शरीर बळकट बनते.

पचनक्रिया सुधारणा
शरीरातील रक्त प्रवाह वाढण्यास चालण्यामुळे मदत मिळते. या शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

सांधेदुखीपासून आराम
दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने सांधेदुखीची समस्या असलेल्यांना फायदा होतो. सांध्यातील जडपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)