तळलेले पदार्थ बनवल्यानंतर तेल उरतच. मग हे तेल पुन्हा भाजी बनवताना वापरले जाते. पण ही तेलाची बचत आरोग्यासाठी चांगली नाही. तसेच हे तेल साठवून ठेवताना व्यवस्थित साठवून ठेवलं जात नाही. जाणून घ्या एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरल्याने त्याचे आरोग्यावर कोणते परिणाम होतात तसेच हे तेल कशा पद्धतीने साठवून ठेवावे.

  • तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरल्याने त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

एकदा वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने पौष्टिक मूल्ये नष्ट होतात. त्यात उष्णतेमुळे रासायनिक अभिक्रिया होऊन तेलातून विषारी धूर निघू लागतो.

तळलेले तेल पुन्हा गरम केल्यास त्यात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची शक्यता वाढते. तसेच हृदयाशी निगडीत समस्या, ऍसिडिटी यांसारख्या समस्या निर्माण होतात.

एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरल्याने त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग वाढतात.

  • पदार्थ तळून झाल्यावर उरलेले तेल कसे साठवून ठेवावे आणि नंतर कसे वापरावे

पदार्थ तळून झाल्यावर उरलेले तेल तसेच साठवून ठेवू नका. तेल थंड झाल्यानंतरच गाळून घ्या आणि ते हवाबंद डब्यात ठेवा.

तेलाच्या रंगात आणि वासात बदल झाला तरी ते वापरू नका. शक्य असल्यास तेलाचा वापर जास्तीत दोनदाच करावा.

टीप : ऑलिव्ह ऑईलसारख्या तेलाचा वापर दुसऱ्यांदा करू नये. शक्यतो मोहरी, राईस ब्रॅन, तीळ आणि सनफ्लॉवरपासून बनवलेलं तेल दुसऱ्यांदा वापरा. असे तेल तीनपेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ नये. कारण त्यात ट्रान्सफॅट तयार होऊ लागतात. ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. महत्वाचं म्हणजे तळलेले पदार्थ बनवताना कमीतकमी तेल वापरा. ज्यामुळे तेल उरणार नाही.