उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उन्हामुळे उष्माघात, डोकेदुखी, त्वचेचे विकार, डिहायड्रेशन, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या जाणवतात. तसेच उष्ण वातावरणामुळे शरीरही लवकर थकते. त्यासाठी जाणून घ्या उन्हाळ्यात तब्येतीची काळजी कशी घ्यावी –

योग्य आहार घ्या, फळे खा
उन्हाळ्यात आहार हलक्या स्वरूपाचा ठेवावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताजे अन्न खा. तसेच आहारात काकडी, दही, ताक, फळे, सरबत, ज्यूस यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा. तिखट, तेलकट अन्न खाणे टाळा. या मोसमात जांभळं मिळतात. जांभळात अँटिऑक्सिडंट असतात. जांभूळ, कलिंगड, टरबूज यांसारखी सिजनल फळे खा. उष्णतेचा त्रास जाणवल्यास कांद्याचा रस, गुळवेल सत्व, गुलकंद, मोरावळा, यांचे सेवन करा.

पौष्टिक पदार्थांचं सेवन करा
उन्हाळ्यात काम करण्यासाठी खूप उर्जा लागते. त्यासाठी आपल्या आहारात पौष्टीक आणि पूरक पदार्थांचा समावेश करा. बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स अवश्य घ्या.

भरपूर पाणी प्या
उन्हाळा म्हटलं की गरमी आलीच. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्या. उन्हाळ्यात आपलं शरीर सतत हायड्रेटेट राहण्यासाठी तसेच शरीराचे तापमान कमी करण्यासाठी खूप पाणी प्या. तसेच तुम्ही सरबत, रस पिऊ शकता.

व्यायाम करा
उन्हाळ्यात एरोबिक्स व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आपले हृदय फिट आणि हेल्थी राहते. तसेच चालणे, धावणे, पोहायला जाणे यांसारखे व्यायामही करू शकता.

डोळ्यांची काळजी घ्या
उन्हाळ्यात दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ आणि थंड पाण्याने धुवा. शक्य असेल तर उन्हात फिरताना चांगला गॉगल वापरा.

पेहराव
उन्हाळ्यात पेहराव सैलसर, वजनाने हलका, फिक्कट किंवा पांढऱ्या रंगाचा परिधान करावा. घराबाहेर जाताना डोक्यात टोपी घालावी किंवा स्कार्फ बांधावा.

झोप
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीराला आराम द्या. चांगली झोप घ्या. झोपेची वेळ ठरवा. रात्री लवकर झोपा. सकाळी लवकर उठा.

चेहऱ्यावर ग्लो हवा आहे, मग झोपण्याआधी 3 मिनिटं ‘हा’ व्यायाम करा

Stop Hair fall : केस गळतीच्या समस्येवर ‘हे’ उपाय ठरतील अत्यंत फायदेशीर