* तेलकट पदार्थ अतिशय कमी प्रमाणात असावेत.

* साय, लोणी, मटण, पामतेल, खोबरेल तेलात स्निग्ध पदार्थ जास्त असतात. त्यावर नियंत्रण ठेवावे.

* दूध, दुधाचे पदार्थ कमी करावे. डालडा, तुपाचे सेवन टाळावे. कमी प्रमाणात सुकामेवा घ्यावा.

* सोयाबीन आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.

* भात, पोळी, भाकरी आदी योग्य प्रमाणात असावे. फळे, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात.