खाद्य पदार्थांमध्ये वापरले जाणारे केशर(Saffron) एक उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे. त्वचेच्या अनेक समस्यांवर केशर गुणकारी आहे. केशर हा व्हिटॅमिन ए, लोह, फॉलिक ऍसिड, लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, कॉपर, झिंक, मॅग्नेशिअमचा मोठा स्रोत आहे. केशराचा वापर करून त्वचेचे सौंदर्य खुलवता येते. मात्र त्याचा योग्य वापर करावा. कारण केशराचा अती आणि चुकीचा वापर त्वचेसाठी घातक ठरू शकतो. जाणून घ्या त्वचेच्या समस्यांवर केशरचा वापर कसा करावा याबद्दल-

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी

दुधामध्ये केशर मिसळा आणि कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. आठवड्यातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता.

त्वचेवरील काळे डाग

पपईचा गर, दूध, मध आणि चिमूटभर केशर मिक्सरमध्ये वाटून घ्या. तयार झालेला पॅक चेहऱ्याला किंवा डाग असलेल्या त्वचेवर लावा. पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे त्वचेवरचे काळे डाग तर कमी होतातच शिवाय त्वचाही मुलायम होते.

पिंपल्स

i ) केशर आणि चंदन पावडर दुधामध्ये मिक्स करा. तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि पाच मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
ii ) तुळशीची पाच-सहा पाने आणि केशरच्या पाच-सहा काड्या पाण्यामध्ये भिजत घाला. व्यवस्थित भिजल्यानंतर त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा.

पिग्मेंटेशन

केशर व दोन चमचे हळद पाण्यामध्ये मिक्स करावी. हे मिश्रण व्यवस्थित भिजल्यानंतर चेहऱ्याला लावावे.

सनटॅन

सनटॅन कमी करण्यासाठीही केशर उपयोगी आहे. एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यात केशर आणि चंदन पावडर मिसळून फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

जखम भरून येण्यासाठी

केशर पाण्यामध्ये भिजवून घ्यावे नंतर वाटावे. त्यामध्ये खोबरेल तेल मिसळावे व जखमेवर लावावे. काही दिवस हा उपाय केल्याने जखम तर भरतेच शिवाय जखमेचे डागही राहत नाहीत.

कोकम सरबत पिण्याचे फायदे

मानसिक तणाव दूर करण्यासाठी करा ‘ही’ योगासने